गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

रोहिंग्या मुस्लिम आहेत तरी कोण ?

रोहिंग्या मुस्लिम आहेत तरी कोण ? केंद्र सरकारने रोहिंगे मुस्लिमांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आणि  या निर्णयावर पुरोगामी विचारांच्या पत्रकार मंडळींनीं रोहिंग्या मुस्लिमांवर अत्याचार होत    असल्याचा माध्यमां मार्फत गवगवा सुरु  केला.  त्यातच मानवाधिकार NHRC (

National Human Rights Commission)

 या संस्थेने रोहिंग्या मुस्लिमांच्या बाजूने केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात याचिका दाखल केली आहे.  पण नक्की रोहिंग्या मुस्लिम आहेत तरी कोण ? रोहिंगे मुस्लिम हे म्यानमार देशातून बांगलादेशी मार्गे बेकायदेशीर भारतात घुसलेले घुसखोर आहेत.  म्यानमार देशात २०१२ मध्ये बुध्दिष्ट आणि रोहिंग्या मुस्लिम यांच्यात दंगली झाल्या या दंगलीमध्ये ३० च्या आसपास बुध्दिष्ट लोक मरण पावले व ५० च्या आसपास रोहिंग्या मुस्लिम मरण पावले यानंतर हा वाद चिघळत गेला आणि या वादाला आंतरराष्ट्रीय राजकीय वळण लागले! म्यानमार च्या मते रोहिंग्या मुस्लिम हे मूळचे बांगलादेशचे असून  ते  म्यानमार बांग्लादेशच्या सीमावर्ती भागात  घुसखोरी करून स्थायिक झाले आहेत . त्याचे कारणही  तसे आहे २०१२ च्या जनगणने नुसार ८,००,००० संख्या  असणारे रोहिंग्या मुस्लिमांची संख्या  २०१७ मध्ये १३,००,००० पर्यंत पोहचली आहे . म्हणजेच हि संख्या केवळ पाच वर्षाच्या कालखंडात सुमारे ६२% आसपास पोहचली आहे एव्हड्या झपाट्याने हि संख्या वाढत असल्याचे पाहून म्यानमार सरकारने हा विषय अधोरेखित केला असावा  . त्याच प्रमाणे greater Bangaladesh Mission अंतर्गत हा प्रकार येऊ शकतो अशी शक्यता इंटेलिजेंट एजेन्सी  मार्फत वर्तवली  गेली होती ( greater Bangaladesh Mission म्हणजे भारतातील भौगोलीक भागासह म्यानमारचा काही भाग जो बंगालीभाषिक या तत्वावर जोडून एक देश निर्माण करणे  माहिती साठी गूगल वर सर्च करावे)  रोहिंग्या मुस्लिम हे मूळचे बांगलादेश चे आहेत असे म्यानमारचे मत आहे.  तर मुस्लिम इतिहासकार काह्लीतुर रेहमानच्या मते इ.स. सहाव्या शतकात आरबी व्यापारी रहिमचे जहाज जेव्हा बुडू लागले त्या वेळी त्या जहाजातील कामगारांनी जिव वाचवण्याच्या हेतूने एका बेटावर उतरले व तेथील राज्यात राहून तिथेच स्थायिक झाले म्हणून त्या रहीम या व्यापाऱ्याचा अपभ्रश होऊन  त्या मुस्लिमांचे नाव रोहिंग्या झाले असे त्याचे मत आहे . तर जहारुद्द्दीन  अहमद व नाजीर अहमद यांच्या मते रोहिंग्या लोक हे अफगाण मधील रुहा समाजातील  आहेत. रुहा या शब्दाचा  अपभ्रश होऊन या मुस्लिमाना रोहिंग्या असे म्हंटले . पण हे इतिहासकार रोहिंग्या नक्की कुठल्या भौगोलीकी प्रदेशात स्थलांतरित झाले होते हे स्पष्ट मांडत नाहीत असो मूळ मुद्द्य कडे वळूयात भारताच्या अधिकृत आकडेवारी नुसार म्यानमारच्या भूमीतून पलायन करून आलेल्या  ४०००० रोहिंग्या मुस्लिमां पैकी १०००० च्या जवळपास काश्मीर मध्ये स्थलांतरित झाले असून उरलेले ३०००० रोहिंग्या मुस्लिम दिल्ली, उत्तरप्रदेश ,आन्धप्रदेश आणि पश्चिम बंगाल मध्ये  स्थायिक झालेलं आहेत अशा परिस्थितीत जर विचार केला तर  भारत लोकसंख्ये मुळे  आधीच त्रस्त आहे  त्यात या लोकांची भर म्हणजे देशाचा आर्थिक भार वाढणार जरी हा मुद्दा बाजूला ठेवला! तरी  पीटीआय च्या अहवाला नुसार २०१३  बोधगया बॉम्बस्फोटात  रोहिंग्याचा हात होता असा  आरोप  अहवालात वर्तविला  आहे.  त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने देखील प्रश्न  उपस्थित राहू शकतात.  रोहिंग्यांना म्यानमार मध्ये पुन्हा का पाठवावे याचा गांभीर्याने विचार करून  उदाहरण देयचे झाले तर मागील दशकभरात सीरिया मधून पलायन  करून युरोप मध्ये स्थलांतरित झालेल्या मुस्लिम लोंढ्या मुळे युरोपचा सामाजिक संतुलन बिघडले त्यामुळे ब्रेक्झिट सारखी परिस्थतीती युरोप मध्ये उद्भवली युरोपीय देशां मध्ये अशांततेचे वातावरण वाढू लागले आहे. त्याच बरोबर  पॅरिस  फ्रांस मध्ये वाढलेली हिंसा दहशदवाद या स्थलांतराला कारणीभूत आहे अशा घटना समोर घडत असताना देखील रोहिंगे मुस्लिम  प्रकरण सरकार  हलके घेत आहे. हा  विषय सरकारने गांभीर्याने घेतला पाहिजे असो   . जे  रोहिंगे   लोक बेकायदेशीर रित्या भारतात घुसू शकतात ते देशाची कायदा सुव्यवस्था आवलंबतील का ?मागील आठवड्यात अलकायदा या दहशदवादी संघटनेच्या 'झाकीर मुसा' नामक अतिरेक्याचा व्हिडिओ समोर आला  त्यात  त्याने    भारताच्या  हिंदूंना आवाहन दिले आहेच पण त्याच बरोबर त्याने रोहिंग्या मुस्लिमाना हटवाल तर त्याचे परिणाम गंभीर असतील असे धमकावले  आहे . कलम ३७० अंतर्गत काश्मीर नागरिक सोडलेच तर इतर भारतीय नागरिकांना काश्मीर मध्ये संपत्ती खरेदी करण्याचा अधिकार नाही अशी तरतूद आहे. पण ३७० कलम हटवले पाहिजे  अशी चर्चा देशभरात रंगत असताना काश्मीर मधील कट्टर पंथी नेते ३७० कलम हटवू नये या साठी तकलादू  युक्तिवाद करतात कि काश्मिरी भूमिपुत्रांचा रोजगार धोक्यात येईल! पण हेच कट्टर पंथी रोहिंग्या मुस्लिमांच्या बाजूने  उभे  राहतात आणि हेच ते लोक आहेत ज्यांनी लाखो काश्मिरी    पंडितांना पिटाळून लावलेच त्याचबरोबर  काश्मिरी पंडितांच्या हत्या देखील केल्या! काहींचे धर्मांतरन केले. चोराच्या   उलट्या बोंबा अशी वृत्ती असणारे हेच कट्टरपंथी लोक  आज रोहिंग्यांच्या न्यायसाठी उभे राहत आहेत योगायोगाने दोघांचाही धर्मसारखाच आहे म्हणूंन यात नक्कीच कुठेतरी पाप दडलेले आहे याच कट्टरपंथीयां प्रमाणे दहशदवादी झाकीर मुसा प्रमाणेच  मानवधिकार  वाल्यांचे  रोहिंग्या घुसखोरां बद्दलचे  प्रेम उफाळून येताना दिसते मात्र हेच   मानवधिकार वाले काश्मीरच्या मूळ काश्मिरी पंडितांच्या अन्यायावर चिडीचूप असतात.  एकूणच मानवाधिकार अलंकायदा आणि काश्मिरी कट्टर पंथ्यांचे विचारां  मध्ये साधर्म्य  आहे. म्हणजेच मानवअधिकार हा भारतीय सुरक्षेच्या बाबतीत आणि    भारतामध्ये १२५ कोटी मानवाच्या सुरक्षे बाबतीत  असंवेदनशील आहेच त्याच बरोबर म्यानमार मध्ये घडणाऱ्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूचे परीक्षण करण्यास  जाणून  बुजून असमर्थता दाखवत  आहेत.  त्याच बरोबर म्यानमार मध्ये रोहिंग्यांच्या हातून   मरणाऱ्या   बौद्धांच्या  बाबत असवेंदनशिल आहेत   असो     मानवाधिकारात मानव म्हणून   मोडणारे  फक्त एका विशिष्ट समाजापुरतेच असावेत असे त्यांच्या वर्तवणुकीतून  जाणवते ....

शनिवार, ७ मे, २०१६

मराठा म्हणजे नक्की कोण ?

मराठा म्हणजे नक्की कोण ????
म्हणे बाप माझा वसे पंढरीत !
आई राहते नित्य तुळजापुरात !!
तया दर्शनासाठी आतुरलेला !
मराठा म्हणावे अशा वाघराला !!
महाराष्ट्रातील सहा कोटी जनते पैकी ज्या लोकांचे श्रद्धास्थान आई तुळजाभवानी खंडोबा ,महालक्ष्मी,श्री गणेश,विठोबा व बाराजोतीरलिंग आहेत त्याच बरोबर जो भगव्या समोर नतमस्तक होतो तो मराठा ही साधी आणि सोपी व्याख्या आहे ....मराठा ही जात नसून मराठा ही वृत्ती आणि याच वृत्तीतुन घडलेला प्रदेश म्हणजे मराठा ... 

खडे सैन्य घेई अटकपार जाई।
जिथें म्लेंच्छ भेटे तिथेँ सूड घेई।।
सदा धाव ज्याची असे उत्तरेला।
मराठा म्हणावे अशा वाघराला

याचे विस्तृत स्पष्टीकरण केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की उत्तर हिन्दुस्थान असेल अथवा दक्षिण हिन्दुस्थान मराठा प्रांतातील लढवय्यानी जिथे आक्रमण केले तेथील लोक आपल्या प्रांतबंधू पूर्वजांना मराठा असेच संबोधत होते बाजीरावांनी आक्रमण केले अथवा मल्हार होळकरांनी आक्रमण केले तरी हे आक्रमण ब्राह्मण अथवा धनगरांनी केले असे न बोलता शत्रु लोक या अक्रमनास मराठ्यांचे आक्रमण किंवा मराठ्यांच विजय किंवा विजयी झालेल्या प्रांताला मराठा प्रांत असे संबोधले जात असे .आपल्या हिन्दुस्तानी राष्ट्रगीतात पंजाब सिंध गुजरात मराठा या काव्य पंक्ती येतात या पंक्ती मध्ये मराठा या प्रांताचा उल्लेख येतोय येथेही
आपल्या लक्षात येईल की मराठा हा प्रांत वाचक शब्द आहे जातीय वाचक
शब्द नाही ...हिंदू संस्कृती नुसार मराठा प्रांतातील (समाजातील )कार्या नुसार कर्मा नुसार जाती लक्षात घेऊयात.देशमुख,पाटील,कोळी,माळी,नाव्ही,धनगर,परिट,शिंपी,मांग,ब्राह्मण,महार,कोष्टी,वंजारी,वडार,वाणी,कुणबी ई. समस्त जाती मराठा समाजात मोडतात....हा लेख प्रपंच मांडण्याचा हेतू इतकाचसैराट नावाच्या चित्रपटाने जातीय क्लेश निर्माण केलाय त्या जातीय क्लेशातून मराठा समाजाचे सामाजीक नुकसान होत आहे.त्या चित्रपटात आपल्या पाटील समाजाची प्रतिमा खराब दाखवली आहे असे मी या चित्रपटावर टिका करणाऱ्या कडून ऐकले आहे .मुळात हा चित्रपट आहे चित्रपटातील घटना काल्पनिक असतात. पाटील समाजाची प्रतिमा खरच तशी असली असती! तर पाटलाला कोणी आमदार खासदर नगरसेवक सरपंच म्हणून निवडून दिले असते का ? हा प्रश्न स्वतःच्या मनालाविचारा . असले फालतू चित्रपट किती आले आणि किती गेले वास्तव आणि काल्पनिकतेत बराच फरक असतो ...
जय महाराष्ट्र ..
जय श्री राम जय शिवराय